विद्यार्थ्यांनो काळजी घ्या! कॅनडातील वाढत्या तणावामुळे भारताचे आवाहन

हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारत-कॅनडा तणाव वाढला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे वक्तव्य केले आहे.

विद्यार्थ्यांनो काळजी घ्या! कॅनडातील वाढत्या तणावामुळे भारताचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

भारत (India) आणि कॅनडामधील (Canada) संबंध आता चांगलेच ताणले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढत चालला असून भारताने आता कॅनडात राहणारे भारतीय विद्यार्थी (Indian Studnets) व नागरिकांसाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच कॅनडाला जाणाऱ्यांनीही काळजी घेण्याचे आवाहन भारताने केले आहे.

 

हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारत-कॅनडा तणाव वाढला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे वक्तव्य केले आहे. भारताकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. पण त्यानंतर दोन्ही देशांमधील मतभेद वाढले आहेत.

शिक्षण विभागाची ‘स्वच्छता’ मोहिम; पाऊण लाख तक्रारी निकाली, सात हजार फायली रद्दीत

 

यापार्श्वभूमीवर बुधवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नियमावली जारी केली आहे. कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि हिंसाचारामुळे तेथील विद्यार्थी व भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कॅनडातील ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत, अशा ठिकाणी आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

 

दरम्यान, दोन देशांमधील वाढत्या तणावामुळे भारतातून कॅनडाला जाण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांवर परिणाम होणार आहे. भारतीयांचा व्हिसा अप्रूव्ह होण्याची टक्केवारी कमी होऊ शकते. त्याचा फटका प्रामुख्याने विद्यार्थी व नोकरदारांना बसणार आहे. पुढील काळात व्हिसाच्या अटी आणखी कडक केल्या जाण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j