जेईई परीक्षेचे नियम झाले आणखी कडक

टॉयलेट ब्रेकनंतर पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे.

जेईई परीक्षेचे नियम झाले आणखी कडक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 देशातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेचे नियम (JEE exam rules)अधिक कडक करण्यात आले असून आता टॉयलेट ब्रेकनंतर पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी  (NTA) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक नियमावलीनुसार आता शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनाही टॉयलेट ब्रेकनंतर पुन्हा तपासणी आणि बायोमेट्रिक्स करावे लागणार आहेत. 

हेही वाचा : कंपनी सेक्रेटरी कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; येत्या १ ते १० जूनला परीक्षा
 JEE Mains 2024 जानेवारी महिन्यात घेतली जाणारी परीक्षा काही दिवसातच होणार आहे.मीडिया रिपोर्टनुसार  NTA ने JEE Mains परीक्षा २०२४ बाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिध्द केले आहेत.  यानुसार परीक्षेदरम्यान उमेदवार, शिक्षक, अधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीने टॉयलेट ब्रेक घेतल्यास त्याला परत येऊन पुन्हा तपासणी करावी लागेल. याबरोबर त्याचे बायोमेट्रिक्सही रिपीट केले जातील. पुन्हा तपासणी आणि बायोमेट्रिक्स केल्यानंतरच तो परीक्षागृहात प्रवेश करू शकतो.

 जेईई मेन परीक्षा २४ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या वर्षीच्या जेईई मेन परीक्षेत २०२४ मध्ये विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत. प्रथमच, JEE Mains साठी अर्जांची संख्या १० लाखाने ओलांडली आहे.परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी सुमारे १२.३ लाख नोंदणी झाली आहे. एप्रिलच्या सत्रात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.