RTE चे बोगस प्रवेश; पॅन कार्ड, आधार कार्ड पडताळणी सक्तीची का नाही? 

प्रवेश घेताना यासाठी तहसीलदाराकडून मिळणारा दाखला ग्राह्य धरला जातो. पण काही सधन पालक चिरीमिरी देऊन  उत्पन्नचा खोटा  दाखला सहज मिळवतात.

RTE चे बोगस प्रवेश;  पॅन कार्ड, आधार कार्ड पडताळणी सक्तीची का नाही? 
RTE Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेताना पालक (Parents) आपली खोटी कागदपत्रे, खोटी माहिती देत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून (Education Department) सक्तीची पाऊले उचलली जावीत. पालकांचे पॅन कार्ड (Pan Card), आधार कार्ड (Aadhar Card) आणि इतर कागदपत्रे सक्तीची करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ यांच्याकडून करण्यात आली आहे. 

वास्तविक RTE अंर्तगत शाळा प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न लाखाच्या आत असणे अपेक्षित आहे. प्रवेश घेताना यासाठी तहसीलदाराकडून मिळणारा दाखला ग्राह्य धरला जातो. पण काही सधन पालक चिरीमिरी देऊन उत्पन्नचा खोटा दाखला सहज मिळवतात. अशी अनेक प्रकरणे समोर येऊन सुद्धा यावर चाप बसत नाही. विशेष म्हणजे याप्रकरणी अनेकवेळा कारवाईची मागणी झाली आहे. 

हेही वाचा : ॲम्बी व्हॅलीत शिक्षण विभागाची कार्यशाळा की इव्हेंट मॅनेजमेंट शो?

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या दीपाली सरदेशमुख (Deepali Sardeshmukh) यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना पत्र पाठवले आहे. "आरटीई25% प्रवेशप्रक्रियेतील नियमबाह्य पद्धतीने होणारे गैरप्रकार व आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी पालकांचे PAN Card, आधार कार्ड व्हेरिफिकेशन प्रत व दुय्यम निबंधक कार्यालयातील भाडेकरार याची पोलीस प्रशासनाकडील उपलब्ध ऑनलाइन पोलीस वेरिफिकेशन सक्तीचे करावे, नियमबाह्य पद्धतीने झालेले बोगस RTE प्रवेश रद्द करावेत. तसेच आरटीई प्रवेश यादी व निधीसह RTE प्रवेशांचे संपूर्ण तपशील राज्यातील जनतेसमोर खुले करावे. " अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.