डीईएस पुणे विद्यापीठ सुरू; विविध अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश

डीईएसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कुंटे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, सदस्य प्रसन्न देशपांडे, प्रा. आशिष पुराणिक आदी उपस्थित होते.

डीईएस पुणे विद्यापीठ सुरू; विविध अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश
DES Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (Deccan Education Society) डीईएस पुणे विद्यापीठ (DES Pune University) हे खासगी विद्यापीठ (Private University) चालू शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित झाले असल्याची माहिती डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे (Dr. Sharad Kunte) यांनी बुधवारी दिली. पुण्यातील इतर खासगी विद्यापीठांच्या तुलनेत डीईएस पुणे विद्यापीठाचे शुल्क कमी राहणार आल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले.

 

डीईएसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कुंटे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, सदस्य प्रसन्न देशपांडे, प्रा. आशिष पुराणिक आदी उपस्थित होते. फर्ग्युसन कॉलेज आणि बीएमसीसी कॉलेजमधील सध्याचे अनुदानित कोर्सेस हे त्या कॉलेजमध्ये सुरूच राहणार असल्याचेही डॉ. कुंटे यांनी स्पष्ट केले.

पानशेतनंतर पुण्यात आणखी चार क्लस्टर शाळा

 

डॉ. कुंटे म्हणाले की, सध्या मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुलात हे विद्यापीठ कार्यान्वित झाले आहे. सध्या या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रामुख्याने विना अनुदानित तत्वावरील अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. आगामी काळात तीन संशोधन केंद्र उभारण्यासाठी साधारण १ लाख स्क्वेअर फुटाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक संकुलात साधारण १० एकर जागा उपलब्ध आहे.

 

या विद्यापीठात स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ ह्युमॅनीटिज अँड सोशल सायन्स, स्कूल ऑफ डिझाईन अँड आर्टस्, स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमॅटिक्स आणि स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशा पाच शाळांची निर्मिती करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही विविध कारणांनी प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना कमी शुल्कात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे डॉ. कुंटे यांनी सांगितले.

 

बी - टेक कम्प्युटर सायन्स प्रवेश प्रक्रिया सुरू

 

यंदाच्या शैक्षणिक वर्षात बी - टेक कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे कम्प्युटर सायन्सला प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना केवळ शुल्क भरून प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे डीईएसच्या शैक्षणिक संकुलात शिकण्याची संधी मिळणार आहे, असे डॉ. प्रसाद खांडेकर यांनी सांगितले.

 

अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ : https://www.despu.edu.in/

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j