शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला अतिरिक्त गुणांच्या प्रस्तावाला केवळ दोन दिवस शिल्लक

माध्यमिक शाळांकडून स्विकारण्यात येणाऱ्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेच्या अतिरिक्त गुणांच्या प्रस्तावाची मुदत शुक्रवारी संपणार

शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला अतिरिक्त गुणांच्या प्रस्तावाला केवळ दोन दिवस शिल्लक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य व माध्यमिकस शिक्षण मंडळतातर्फे इयत्ता दहावीच्या शास्त्रीय कला, चित्रकला (Classical Art, Painting) क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना  अतिरिक्त गुण (Extra points) दिले जातात. त्याबाबतचे प्रस्ताव स्वीकारले जाता असून शिक्षण विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापुढे कोणीतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे प्रस्ताव सादर करण्यास १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.या मुदतवाढीनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे दिलेल्या मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करता आले नाही. त्यामुळे 16 फेब्रतुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे ओक यांनी सांगितले.