SPPU NEWS : विद्यापीठात रॅक खरेदीत घोटाळा ? 

परीक्षा विभागाने मागणी केलेली नसताना हे रॅक खरेदी करण्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे हे प्रकरण समोर येणार की दाबले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.  

SPPU NEWS : विद्यापीठात रॅक खरेदीत घोटाळा ? 
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागात को-या उत्तरपत्रिका (Answer Sheet in Examination Section) ठेवण्यासाठी घेलेल्या रॅकची खरेदी (Purchase of racks) वादात सापडली आहेत.परीक्षा विभागाने मागणी केलेली नसताना हे रॅक खरेदी करण्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे ही खरेदी कोणी आणि का केली ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून याबाबत विद्यापीठ वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : वारे गुरूजी यांची निर्दोष मुक्तता ; अखेर सत्याचा विजय

विद्यापीठाशी संलग्न असणा-या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेतल्या जातात.पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे सात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाला घ्यावी लागते.त्यासाठी कोट्यवधी उत्तरपत्रिकांची छपाई करावी लागते. परीक्षा विभागात सुमारे ४५ लाख को-या उत्तरपत्रिका ठेवण्याची व्यवस्था आहे.परीक्षेपूर्वी या उत्तरपत्रिका संबंधित परीक्षा केंद्रांवर पाठवल्या जातात.या उत्तरपत्रिका ३६, २४, १६ पानी असातात.त्यांचे वितरण सुलभपणे व्हावे,  यासाठी ओपन रॅक असणे गरजेचे आहे.सध्य स्थितीत ओपन रॅक मधूनच उत्तरपत्रिकांचे वितरण केले जाते. मात्र,गरज नसताना खरेदी करण्यात आलेल्या रॅक या बंदिस्त असून त्यांचा वापर करण्यासाठी वीजेची गरज लागते.

 रॅक खरेदीचे टेंडर सुमारे दोन वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गाने मंजूर करण्याचा प्रयत्न केला जात होता.माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्या कार्यकाळात परीक्षा विभागाला अशा रॅकची गरज नसल्याचे सांगत हा विषय बाजूला ठेवला होता.मात्र, प्रभारी कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या कार्यकाळात हे टेंडर मंजूर करण्यात आले.पूर्वी ३.५ कोटी रुपयांचे असणारे टेडेंर आता ४ ते ५ कोटी पर्यंत वाढवण्यात आले आहे.परीक्षा विभागाने रॅक खरेदीची मागणी न केल्यामुळे ते बिल्डिंग वकर्स कामिटीतून आणले गेले,असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

कारभारी काळे यांच्या कार्यकाळात कुलगुरूंच्या बंगल्यासाठी लाखो रुपयांच्या वस्तूंची खरेदी झाल्याचे समोर आले होते.आता परीक्षा विभागासाठी घेलेल्या रॅक खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे हे प्रकरण समोर येणार की दाबले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे , अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.  
 --------------------------