CBSE : पेपर फुटल्याच्या अफवा;  विश्वास ठेऊ नका 

विद्यार्थ्यांना देखील इशारा दिली आहे की ते बोर्ड परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारची खोटी बातमी पसरवण्यात दोषी आढळले, तर त्यांच्यावर UFM नियमानुसार कारवाई केली जाईल.

CBSE : पेपर फुटल्याच्या अफवा;  विश्वास ठेऊ नका 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषद CBSE च्या इयत्ता 10वी, 12वी परीक्षा (10th, 12th Exam) येत्या 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 दरम्यान होणार आहेत, या पार्शवभूमीवर पेपर लिक झालेत किंवा परीक्षेच्या तारखा, वेळा बदलल्या अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असा अलर्ट बोर्डाने सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी  जारी केला आहे.

CBSE ने मंगळवार (दि. 13 ) याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार  बोर्डाच्या परीक्षांबाबत सर्व विद्यार्थी आणि पालकांनी CBSE 10वी, 12वी परीक्षांबाबत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. बोर्डाने विद्यार्थ्यांना सावध केले आहे की  पेपर फुटल्याचा खोटा दावा करून परीक्षेच्या वेळी अनेक सोशल मीडिया साइट्स किंवा ग्रुप्सवर पेपर व्हायरल केले जातात. अनेक गट प्रश्नपत्रिकेसाठी पैशांची मागणीही करतात, अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही CBSE ने विद्यार्थी-पालकांना दिला आहे.

यासोबतच सीबीएसईने जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये असे जाहीर करण्यात आले आहे की,  बोर्ड अशा घटनांवर  कडक नजर ठेवत आहे. या असामाजिक घटकांवर विविध कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. तसेच  बोर्डाने अशा विद्यार्थ्यांना देखील इशारा दिली आहे की ते बोर्ड परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारची खोटी बातमी पसरवण्यात दोषी आढळले, तर त्यांच्यावर UFM नियमानुसार कारवाई केली जाईल.