'क्लस्टर विद्यापीठ ' नको रे बाबा...संस्थाचालकांची सावध भूमिका 

पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांनी समूह विद्यापीठाचा प्रस्ताव शासनास सादर केला नाही.

'क्लस्टर विद्यापीठ ' नको रे बाबा...संस्थाचालकांची सावध भूमिका 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन शैक्षणिक धोरणात (National Educational Policy)समूह विद्यापीठे अर्थात क्लस्टर विद्यापीठ(Cluster University) विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.त्यामुळे राज्य शासनाने क्लस्टर विद्यापीठासंदर्भातील नियमावली मंजूर करून राज्यातील संस्थाचालकांना आपल्या विविध महाविद्यालयांचे मिळून क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्याचे आवाहन केले.मात्र,अद्याप पुण्यातील एकाही शैक्षणिक संस्थेने याबाबतचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे सादर केला नाही.परंतु, मुंबईतील एका संस्थेने प्रस्ताव सादर केला असून शासनाकडून संबंधित संस्थेच्या प्रस्तावाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर क्लस्टर युनिव्हर्सिटी  स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र,तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही अद्याप शैक्षणिक संस्था याबाबत सावध भूमिका घेऊन आहेत.शासनाकडून या नियमावलीत आणखी काही बदल केले जाऊ शकतात का ? याची संस्थांचालक वाट पाहता आहेत.त्यामुळेच पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांनी समूह विद्यापीठाचा प्रस्ताव शासनास सादर केला नाही.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी समूह विद्यापीठासाठी इच्छुक असले तरी सध्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे.तसेच शिक्षण प्रसारक मंडळीने या दृष्टीने अद्याप विचारच केला नसल्याचे संस्थेच्या वरिष्ठ पदाढीकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
  समूह विद्यापीठांबाबत निर्माण झालेले गैरसमाज दूर करण्यासाठी स्वत: उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील संस्थांचालकांची बैठक घेतली होती.त्यात त्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले होते.मात्र, विद्यापीठांना द्यावी लागणारी अनामत रक्कम होमी आहे.तसेच कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेवर शासनाचा अंकुश राहणार आहे.कुलसचिव, अधिष्ठाता यांसह विविध पदांची निर्मिती करून त्यांच्या वेटनाचा भार संस्थांना सोसावा लागणार आहे.त्यामुळे सध्या अनेक संस्थांनी सावध भूमिका घेतली आहे. 

उच्च शिक्षण विभागाकडे मालाड कांदिवली एज्युकेशन सोसायटीने समूह विद्यापीठासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.लवकरच या प्रस्तावाची तपासणी केली जाणार आहे.परंतु, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एकही प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे सादर झाला नाही.त्यामुळे क्लस्टर विद्यापीठ नको रे बाबा असे अनेक संस्थांचालक म्हणत असल्याचे बोलले जात आहे.