'सीबीएसई' बोर्ड होणार आता आंतरराष्ट्रीय; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

'सीबीएसई'ला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बोर्ड म्हणून सादर करण्याच्या त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

'सीबीएसई' बोर्ड होणार आता आंतरराष्ट्रीय; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
Union Education Minister Dharmendra Pradhan

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (CBSE) आकर्षण वाढत असताना आता हे मंडळ आंतरराष्ट्रीय (International Board) स्तरावर घेऊन जाण्याबाबत केंद्र शासन (Central Government) गांभीर्याने विचार करत आहे. केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी बुधवारी यासंदर्भात पुण्यात सूतोवाच केले.'सीबीएसई'ला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बोर्ड म्हणून सादर करण्याच्या त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी स्पष्ट केले. 

जपान येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) शाळा असून तेथे केवळ भारतीय नाही तर जपानी विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती इतर बोर्डांपेक्षा अधिक चांगली वाटतो. त्यातून आपणही 'सीबीएसई'ला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बोर्ड म्हणून सादर करावे, असा विचार समोर आला. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाई सुरू असल्याचे धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले. 

'ते' विद्यार्थी डार्विनचा सिध्दांत शिकू शकणार नाहीत, हा मुद्दा योग्य; धर्मेंद्र प्रधान यांचे विधान

जी २० निमित्त पुण्यात शिक्षण कार्य गटाच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय शिक्षण विभागात वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, भारतीय शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. जपान मधील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम इतर बोर्डांपेक्षा अधिक चांगला वाटत आहे. सीबीएसई बोर्डाच्या गणित व विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमातून इतर बोर्डाच्या अभ्यासक्रमांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांना अधिक सखोल ज्ञान मिळत आहे. त्यामुळे आपणही 'सीबीएसई' बोर्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जात आहोत.भारतात काही विद्यार्थी आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेतात. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाचे शिक्षण घेता यावे, असा प्रयत्न आहे.

सध्याचे द्विलक्षी अभ्यासक्रम बंद होणार; नवीन अभ्यासक्रम ठरले, राज्य सरकारचा निर्णय

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे पुढील काळात देशाच्या शिक्षणाक्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळतील, असे नमूद करून धर्मेंद्र प्रधान म्हणाले, जगभरातील राष्ट्रांकडून 'एनईपी'चे स्वागत केले जात आहे. तसेच चीन, जपान, जर्मनी तैवान, कोरिया यांसारख्या राष्ट्रांमध्ये इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले जात नाही तर स्थानिक भाषांना महत्त्व दिले जाते. तरीही ही राष्ट्र इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन मध्ये पुढे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही भारतीय भाषांमधील शिक्षणालाच महत्त्व दिले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo