दिल्लीनंतर आता 'आप' सरकार करतेय पंजाबच्या शिक्षण क्षेत्रात मोठा बदल

पंजाबला शिक्षण क्षेत्रात आघाडीचे राज्य बनवण्याच्या कटिबद्धता नुसार, राज्य सरकारने शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री मान म्हणाले.

दिल्लीनंतर आता 'आप' सरकार करतेय पंजाबच्या शिक्षण क्षेत्रात मोठा बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दिल्लीतील शाळांमध्ये (Delhi Schools) आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून सुरु केलेल्या बदलांमुळे चर्चेत असलेले 'आप' सरकार (AAP Government) आता पंजाबच्या (Punjab) शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल आणत आहे. याचा पहिला टप्पा म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी मंगळवारी शिक्षण विभागात (Education Department) मोठी भरती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.

 

शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगवंत मान यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना भगवंत मान म्हणाले, "पंजाबला शिक्षण क्षेत्रात आघाडीचे राज्य बनवण्याच्या कटिबद्धता नुसार, राज्य सरकारने शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत कॅम्पस मॅनेजर, सफाई कर्मचाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पदांवर भरती करण्यात येणार आहे. 

NEP 2020 : सुकाणू समितीत शिक्षण आयुक्तांचाही केला समावेश, काही तासांत बदलला जीआर

पंजाबमध्ये 'स्कूल ऑफ एमिनेन्स' सुरू करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. या शाळांच्या स्थापनेसाठी ६८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून १३ सप्टेंबर रोजी पहिली शाळा लोकांना समर्पित करण्यात येणार आहे. पंजाबमधील शाळांवा झळाळी दिली जात असून जवळपास १० हजार वर्गखोल्या हायटेक करण्यात आल्या आहेत.

 

शिक्षण मंत्री हरज्योतसिंग बैंस म्हणाले की, "आता दर आठवड्याला टीचर ऑफ द वीक कार्यक्रम सुरू केला जाईल. पंजाबमधील पत्रकारांना आणि जनतेला त्यांच्या योगदानाची माहिती दिली जाईल." यावेळी मुख्यमंत्र्यांनी ८० शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. मान सरकारने काही महिन्यांपुर्वीच १२ हजार ७१० शिक्षकांना नियमित केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j