NEP 2020 : देशातील ७२१ विद्यार्थी बनले ‘सारथी’; ‘युजीसी’चे दूत म्हणून करणार काम

प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेला तीन नावांची यादी द्यायची होती. विद्यापीठांनी पाठवलेल्या नावांच्या आधारे ७२१ विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

NEP 2020 : देशातील ७२१ विद्यार्थी बनले ‘सारथी’; ‘युजीसी’चे दूत म्हणून करणार काम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत (NEP 2020) जनजागृती करणे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील (Higher Education) सुधारणा आणि योजनांची माहिती व्हावी, विद्यार्थी मनातील शंका आणि गैरसमज दूर व्हावेत यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सारथी (NEP Saarthi) निवडले आहेत. UGC ने सारथी योजनेसाठी देशभरातील २६२ विद्यापीठांमधील ७२१ विद्यार्थ्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना UGC चे अध्यक्ष प्राध्यापक एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, "NEP सारथीची घोषणा जुलैमध्ये सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणे आणि विद्यार्थ्यांना त्याची योग्य माहिती आणि फायदे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. त्यानंतर या योजनेसाठी सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या नावांची यादी मागविण्यात आली होती.

Times Ranking 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पुन्हा घसरण, देशातील 91 संस्थांचा समावेश

प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेला तीन नावांची यादी द्यायची होती. विद्यापीठांनी पाठवलेल्या नावांच्या आधारे ७२१ विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना सारथी किंवा विद्यार्थी दूत असेही म्हणता येईल, असे जगदीश कुमार यांनी सांगितले. NEP संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे या हा योजनेचा मुख्य हेतू आहे.

 

NEP 2020 च्या तरतुदींचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, NEP 2020 उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्रोत्साहन देणे, NEP च्या अंमलबजावणीसाठी मदत करणे, NEP उपक्रमांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी फीडबॅक यंत्रणा उभारणे, हा 'NEP सारथी' योजने मागचा उद्देश आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j