आरटीई प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

राज्यातील ८ हजार ८२७ शाळांमधील एक लाख १ हजार ९२६ जागांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पुण्यातील ९३५ शाळांमधील १५ हजार ६१२ जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून बुधवारपासून (दि.१) आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची नियमावली शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. राज्यातील ८ हजार ८२७ शाळांमधील एक लाख १ हजार ९२६ जागांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पुण्यातील ९३५ शाळांमधील १५ हजार ६१२ जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत.

     राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून पालकांना आपल्या पाल्याचा ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनाथ बालके, घटस्फोटीत महिला, कोरणामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. पालकांना १ मार्च ते १७ मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. प्रवेश याबाबतची सविस्तर माहिती व नियमावली या https://student.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.