NEET PG समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी आज पासून नोंदणी सुरू

पहिल्या फेरीसाठी नोंदणी आणि पेमेंट विंडो २७ जुलै ते १ ऑगस्ट दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध असेल, असे  MCC कडून सांगण्यात आले आहे. 

NEET PG समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी आज पासून नोंदणी सुरू
NEET PG 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी  २७ जुलैपासून नोंदणी सुरू होत आहे. NEET PG परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार आजपासून MCC च्या अधिकृत वेबसाइट https://mcc.nic.in/pg-medical-counselling/ वर अर्ज करू शकतील. (NEET PG Admission Process)

पहिल्या फेरीसाठी नोंदणी आणि पेमेंट विंडो २७ जुलै ते १ ऑगस्ट दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध असेल, असे  MCC कडून सांगण्यात आले आहे.  समुपदेशन फेरीसाठी चॉइस फिलिंग आणि लॉकिंग  २८ जुलै ते  २ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तसेच पहिल्या  फेरीसाठी जागा वाटप प्रक्रिया ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी राज्यात ‘युवा पर्यटन मंडळ’; राज्य शासनाचा निर्णय

पहिल्या फेरीसाठीच्या जागा वाटपाची यादी ५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दि. १ ते ६ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांनी MCC पोर्टलवर  कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तर ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांनी त्यांना निवड झालेल्या महाविद्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत. 

समुपदेशनासाठी अशी कराल नोंदणी 

* MCC च्या अधिकृत वेबसाइटवर जा. 

* होमपेजवर उपलब्ध असलेल्या NEET PG Counseling 2023 लिंकवर क्लिक करा. 

* एक नवीन विंडो उघडेल, आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा आणि सबमिट करा. 

* अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

* अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा. फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD