NEET PG : 'नीट पीजी'साठी अर्ज प्रक्रिया सुरु, 'ही' तारिख अंतिम 

वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी, एम.एस., डी.एन.बी. यासारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या 'नीट पीजी' या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

NEET PG : 'नीट पीजी'साठी अर्ज प्रक्रिया सुरु, 'ही' तारिख अंतिम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी, एम.एस., डी.एन.बी. (M.D., M.S., D.N.B.) यासारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी (Post Graduate Education) घेतल्या जाणाऱ्या 'नीट पीजी' या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. एमबीबीएस पदवीधारकांसाठी (MBBS degree holder) विविध विषयातील शिक्षण घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. ६ मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. १७ जून पासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील.  तर येत्या २३ जून रोजी परीक्षा घेतली जाईल. 

केंद्रीय स्तरावर पदव्युत्तर शिक्षणासाठी नीट पीजी ही एकमेव परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे राबवण्यात येते. त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडत  नाही. नीट पीजी ८०० गुणांची परीक्षा संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येते. ही परीक्षा २३ जून रोजी सकाळी ९ ते १२:३० या वेळेत घेतली जाईल. अर्जातील त्रुटी दुर करण्यासाठी २६ मे ते ३ जून हा मोठा कालावधी विद्यार्थ्यांसाठी देण्यात आला आहे. या कालावधीत मुळ अर्जात बदल करता येणार आहेत. 

नीट-पीजीची परीक्षा देशभरातील २५९ केंद्रावर एकाच दिवशी एका वेळेत २२ जून रोजी घेण्यात येईल. एमबीबीएस नंतर १५ ऑगस्ट आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. देशपातळीवरील तसेच राज्यपातळीवरील सर्व पदव्युत्तर जागांवरील प्रवेश हे या प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारावर दिले जातात. त्यामुळे वैद्यकीय  पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेचे अत्यंत महत्त्व आहे.