दहावी-बारावी नव्हे आता नववीही ठरणार महत्वाची, अभ्यासक्रमात मोठा बदल

इयत्ता ११ वी आणि १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य लक्षात घेऊन विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. ९वी ते १२ वी  पर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे १६ अभ्यासक्रम शिकणे बंधनकारक असेल.

दहावी-बारावी नव्हे आता नववीही ठरणार महत्वाची, अभ्यासक्रमात मोठा बदल
NCFSE 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) २०२३ मध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ९वी ते १२ वी  पर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे १६ अभ्यासक्रम शिकणे बंधनकारक असेल. याचा अर्थ आता विद्यार्थ्याला नववीपासूनच आपल्या भविष्याची तयारी सुरू करावी लागणार आहे. नॅशनल करिक्यूलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन  (NCFSE 2023) नुकतेच जाहीर करण्यात आले असून त्यात हे बदल सुचविण्यात आले आहेत.

वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडविण्याबाबत विद्यार्थी अनेकदा तणावाखाली असतात. यामुळेच महागडे कोचिंग करूनही विद्यार्थी नापास होण्याच्या भीतीने आपले जीवन संपवतात. या समस्या लक्षात घेऊन इयत्ता ९वी ते १२ वी चा अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे आहे हे स्वतः ठरवता येईल. दहावीपर्यंत विविध विषयांचा तपशीलवार अभ्यास करून जाणून घेतल्यावर त्याला अकरावीत तीन पर्याय मिळतील.

विद्यार्थ्यांचा भार कमी होणार; पूर्व प्राथमिक विना पुस्तक तर इयत्ता पहिली-दुसरीसाठी दोनच पुस्तके

पहिल्या पर्यायात  मानवता, सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित आणि संगणन हे विषय असतील. दुसऱ्या पर्यायात  आंतरविद्याशाखीय क्षेत्र असेल, ज्यांना पदवीनंतर संशोधन क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे त्यांच्यासाठी हा पर्याय असेल. तर  तिसऱ्या श्रेणीमध्ये लेखक, क्रीडा आणि व्यावसायिक हे विषय  निवडण्याचा पर्याय असेल. ९वी, १०वी, ११वी आणि १२वी दुय्यम टप्प्यात ठेवून त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

इयत्ता १०वी पूर्ण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना इयत्ता ९वी आणि १०वीच्या दोन वर्षांमध्ये एकूण आठ अभ्यासक्रमांपैकी प्रत्येकी दोन आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. उदाहरणार्थ, सध्या दहावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना किमान पाच विषयांचा अभ्यास करावा लागतो, मात्र नव्या नियमांमध्ये आठ विषय ठेवण्यात आले आहेत. यात मानवता  , गणित  आणि संगणन, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय विषय आहेत.

NCFSC 2023 : आता वर्षातून दोन वेळा होणार बोर्डाच्या परीक्षा

इयत्ता ११ वी आणि १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य लक्षात घेऊन विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. ९वी ते १२ वी  पर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे १६ अभ्यासक्रम शिकणे बंधनकारक असेल. याचा अर्थ आता विद्यार्थ्याला नववीपासूनच आपल्या भविष्याची तयारी सुरू करावी लागेल. त्याला सर्व विषय शिकवले जातील जेणेकरुन त्याने बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असा गोंधळ होऊ नये.  मानवता या विषयात  भाषा, साहित्य आणि तत्त्वज्ञान असेल. तर समाजशास्त्र या अभ्यासक्रमात   इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय असतील  तर विज्ञानाच्या अभ्यासक्रमात  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास करावा लागेल.

गणित आणि संगणक या अभ्यासक्रमात  गणित, संगणक विज्ञान, व्यवसाय गणित हे विषय शिकवले जातील.  संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला या विषयांचा समावेश व्यावसायिक कौशल्य विकास अभ्यासक्रमात असेल.  क्रीडा या विषयात  खेळ, योगा आदींवर माहिती दिली जाईल. तर  आंतरविद्याशाखीय या अभ्यासक्रमात वाणिज्य, आरोग्य, माध्यम, समुदाय विज्ञान, भारताचे ज्ञान, कायदेशीर अभ्यास आदी विषय शिकवले जातील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo