राज्यातील शाळेत आता केंद्राची पीएमश्री योजना

पीएमश्री योजने अंतर्गत या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

राज्यातील शाळेत आता केंद्राची पीएमश्री योजना

केंद्र शसनाची पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूप बदलून जाणार आहे. पीएमश्री योजने अंतर्गत या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

     केंद्र सरकारच्या या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक जीवनाशी निगडित प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या योजनेत आहे.तसेच ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा आधुनिक सोयी व सुविधा या योजनेत असतील.

    केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ रोजी योजनेची घोषणा केली. त्या अंतर्गत देशात १४ हजार ५९७ शाळा सुरू करण्यात येणार आहे.या शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जातील. देशातील सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाणार आहे.