SSC Board : पेपरफुटी प्रकरणांवरील गुन्ह्यांचे पुढे काय झाले?

HSC Board : सोशल मीडियात प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याच्या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी आणि ठोस कारवाई होत नसल्याची खंत शिक्षण विभागातून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'एज्यु वार्ता ' शी संवाद साधला.

SSC Board : पेपरफुटी प्रकरणांवरील गुन्ह्यांचे पुढे काय झाले?
SSC Board Paper Leak

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Board) इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षांसाठी कॉपी (Copy Cases) मुक्त अभियान राबवण्यात येते. पण योग्य कारवाईच्या अभावामुळे हे अभियान केवळ नावापुरतेच राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर्षी झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत (HSC Board) पेपर फुटीची बरीच प्रकरणे समोर आली. तरीही या प्रकरणातील आरोपींवर योग्य कारवाई होत नसल्यामुळे अशा प्रकरणांवर आळा घालणे अवघड होऊन जाते, असा खेद शिक्षण विभागातील (Education Department) अधिकाऱ्यांकडूनच व्यक्त केला जात आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

नुकत्याच झालेल्या १० वी - १२ वीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीची प्रकरणे समोर आली होती. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये १२ वी चा गणिताचा पेपर परीक्षेआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डोंबिवली येथेही असाच प्रकार उघडकीस आला होता. याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाली होती. तर पुण्यातील एका शाळेच्या सिक्युरिटी गार्डच्या मोबाईलवर परीक्षा केंद्रावर विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. परीक्षा केंद्रावर मोबाईल फोनला सक्त मनाई असताना संबंधित सुरक्षा रक्षकाच्या मोबाईल मध्ये तो फोटो कसा आला, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते.

हेही वाचा : 'आधार'वरील संच मान्यतेला न्यायालयात देणार आव्हान

या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी आणि ठोस कारवाई होत नसल्याची खंत शिक्षण विभागातून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'एज्यु वार्ता ' शी संवाद साधला. अधिकारी म्हणाले, "राज्य शिक्षण मंडळाकडून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कॉपी मुक्त अभियान राबवले जाते. बैठे पथक, भरारी पथक, पोलिसांची पथके नेमली जात आहेत. तरीसुद्धा कॉपी आणि पेपर फुटीची प्रकरणे घडतात. कारण प्रकरणात सखोल चौकशी आणि आरोपींविरुद्ध ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकरणावर आळा बसत नाही," अशी कबुली संबंधित अधिकाऱ्याने ' एज्युवार्ता' (EduVarta) सोबत बोलताना दिली.