विद्यार्थ्यांचा भार कमी होणार; पूर्व प्राथमिक विना पुस्तक तर इयत्ता पहिली-दुसरीसाठी दोनच पुस्तके 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NCF चे  प्रकाशन केले. NCF मध्ये नमूद केल्यानुसार, मूल्यांकनामध्ये, लेखी परीक्षेऐवजी, शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात मुलांकडून  छोट्या वर्कशीट करून घेतील त्या आधारावर  त्यांचे मूल्यांकन करतील.

विद्यार्थ्यांचा भार कमी होणार; पूर्व प्राथमिक विना पुस्तक तर इयत्ता पहिली-दुसरीसाठी दोनच पुस्तके 
NCFSE 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या शिफारशींतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) २०२३ मध्ये शैक्षणिक ढाच्यात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आता NCF नुसार शाळांमध्ये नर्सरी, केजी, एलकेजी हे शालेय शिक्षणाचा (School Education) भाग असतील पण विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच पुस्तक पहिल्यांदाच दिसेल. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणिताची दोनच पुस्तके अभ्यासाला असतील. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत औपचारिक परीक्षेऐवजी मूल्यांकन (Assessment) होईल. मूल्यांकनाच्या आधारे ग्रेड दिली जाईल. 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NCF चे  प्रकाशन केले. NCF मध्ये नमूद केल्यानुसार, मूल्यांकनामध्ये, लेखी परीक्षेऐवजी, शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात मुलांकडून  छोट्या वर्कशीट करून घेतील त्या आधारावर  त्यांचे मूल्यांकन करतील.

NCFSC 2023 : आता वर्षातून दोन वेळा होणार बोर्डाच्या परीक्षा

पाचव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना भाषा, गणित, मानवी मूल्ये, भारतीय परंपरा, खेळातील जागतिक घडामोडी आणि खेळ यांच्याशी निगडीत माहिती देतील  तर तिसरी, चौथी आणि पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना भाषा, विज्ञान, गणित, शारीरिक शिक्षण याबरोबरच लेखन, वाचन आणि संभाषण कौशल्य यावर आधारित शिक्षण देतील.  या तिन्ही वर्गांमध्ये गणित आणि भाषा या विषयांवर भर दिला जाईल.  वर्ग, वय यानुसार प्रत्येक विषयाचे मूल्यमापन करून त्यातील उणिवा दूर केल्या जातील.

सहावी ते आठवीच्या वर्गात लेखी परीक्षेवर भर

इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात प्रथमच लेखी परीक्षेवर भर दिला जाणार आहे. येथे शिक्षक वर्गात तपशीलवार विषय शिकवतील. विज्ञान, सामाजिक शास्त्र, व्यावसायिक शिक्षणाचे विषय येथे जोडले जातील. लेखी परीक्षेबरोबरच मूल्यांकनावरही भर दिला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा वर्ग आणि वयाच्या आधारे आकलन आणि ज्ञानाची चाचणीही घेतली जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo