'आयसर'च्या संचालक पदी प्रा. सुनील भागवत

भागवत यांचे केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात संशोधन असून विविध संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे.

'आयसर'च्या संचालक पदी प्रा. सुनील भागवत
Prof. Sunil Bhagwat

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) संस्थेच्या संचालक पदी मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधील प्राध्यापक सुनील भागवत (Sunil Bhagwat) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भागवत हे आयसर पुणे संस्थेचे आत्तापर्यंतचे तिसरे संचालक आहेत.  

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येेथे क्लिक करा. http://eduvarta.com/   

भागवत यांचे केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात संशोधन असून विविध संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते मुंबई इन्स्टिट्यूट केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) येथे प्राध्यापक आणि डीन आहेत. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग, एनर्जी, कम्प्युटर प्रोसेस सोल्युशन, आर्टिफिशल न्यूरल नेटवर्क या क्षेत्रात संशोधन केले आहे. भागवत हे विद्यार्थी प्रिय शिक्षक असून 2016 चा इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.