‘प्रोटेक’ने दिले विद्यार्थ्यांच्या नाविण्यपूर्ण संशोधनाला व्यासपीठ

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘प्रोटेक’चे आयोजन गेल्या चार वर्षांपासून केले जात असून, ही राष्ट्रीय स्तरावरील एक लोकप्रिय स्पर्धा आहे.

‘प्रोटेक’ने दिले विद्यार्थ्यांच्या नाविण्यपूर्ण संशोधनाला व्यासपीठ
Protech 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT) येथे अभियांत्रिकीच्या (Engineering) अंतिम वर्षाच्या पदवीपूर्व  व पदविकाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोटेक २०२३’ (Protech 2023) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये  सुमारे २५० विद्यार्थ्यांनी (Students) सहभाग घेतला. त्यापैकी १९० पदविका विद्यार्थी आणि ८० अंतिम वर्ष अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘प्रोटेक’चे आयोजन गेल्या चार वर्षांपासून केले जात असून, ही राष्ट्रीय स्तरावरील एक लोकप्रिय स्पर्धा आहे. प्रोटेक २०२३ च्या उदघाटन समारंभासाठी इंडस्ट्री इनोव्हेशन कन्सल्टंट विश्वास वैद्य यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच यावेळी सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. केतन कोटेचा उपस्थित होते. 

पक्षांच्या अधिवासासाठी समृध्द 'फर्ग्युसन'

स्पर्धेतील अनेक प्रकल्प सामाजिक समस्या आणि अभियांत्रिकी उपाय आदी विषयांवरील होते. त्यामध्ये पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया, ऑटोमेशनचा वापर आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी AIML यांचा समावेश होता. हायड्रोजन उत्पादन आणि हायब्रीड इलेक्ट्रिकशी संबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प या स्पर्धेत प्रदर्शित करण्यात आले. या प्रकल्पामध्ये एक पोस्टर स्पर्धा देखील समाविष्ट होती.

स्पर्धेमध्ये  सुमारे २५० विद्यार्थ्यांनी  (९६ संघ) आपला सहभाग नोंदवला.  त्यापैकी १९० डिप्लोमा विद्यार्थी आणि ८० अंतिम वर्ष अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर, सातारा आदी शहरातून या स्पर्धेसाठी विद्यार्थी सहभागी झाले होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2