NEET-UG 2024 : त्या विद्यार्थ्यांच्या निकालांची होणार पुनर्तपासणी; शिक्षण मंत्रालयाकडून चौकशीसाठी पॅनेल

NEET-UG 2024 मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांची पुनर्तपासणी करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक पॅनेल तयार केले आहे.

NEET-UG 2024 : त्या विद्यार्थ्यांच्या निकालांची होणार पुनर्तपासणी; शिक्षण मंत्रालयाकडून चौकशीसाठी पॅनेल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मेडिकल प्रवेशासाठी (Medical admission)घेण्यात आलेल्या  NEET-UG 2024 परीक्षेचा वाद चिघळत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ही परीक्षा पुन्हा घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र, तामिळनाडू राज्य पुनर्परीक्षेची मागणी (Demand for re-examination)केली जात आहे. पण नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मात्र परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे,असे असले तरी आता  NEET-UG 2024 मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांची पुनर्तपासणी करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक पॅनेल तयार केले (panel formed by the Ministry of Education)आहे.

(Director General of National Testing Agency Subodh Kumar Singh)नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार सिंह म्हणाले, “NEET-UG मधील ग्रेस गुणांसह भरपाईचा पात्रता निकषांवर कोणताही परिणाम होणार नाही. उमेदवारांच्या निकालात ज्यांना वाढीव गुण देण्यात आले आहेत. त्यांच्या निकालात सुधारणा केली जाऊ शकते, परंतु, प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही."

आम्ही सर्व गोष्टींचे पारदर्शक पद्धतीने विश्लेषण केले आणि त्यानंतर निकाल जाहीर केला. वादाचा मुद्दा 4 हजार 750 केंद्रांपैकी सहा केंद्रांपुरता मर्यादित असून  24 लाख उमेदवारांपैकी 1 हजार 600 उमेदवारांवर याचा परिणाम झाला आहे. संपूर्ण देशात या परीक्षेबाबत कोणतीही तडजोड झालेली नाही. आम्ही आमच्या प्रणालीचे विश्लेषण केले आहे.त्यात कोणताही पेपर लीक झाला नाही.” असा दावाही सुबोध सिंह यांनी केला.

सुबोध कुमार सिंह म्हणाले, “ उमेदवारांनी काही मुद्दे मांडले होते. ही जगातील किंवा देशातील सर्वात मोठी स्पर्धात्मक परीक्षा आहे. जी एका शिफ्टमध्ये सुमारे 24 लाख उमेदवार आणि 4,750 केंद्रांवर आयोजित केली जाते. प्रश्नपत्रिकांच्या चुकीच्या वाटपामुळे सुमारे सहा केंद्रांवर समस्या निर्माण झाल्या.त्यामुळे सुमारे 16 हजार परीक्षार्थी प्रभावित झाले होते. त्यांना कमी वेळ मिळाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. याबाबत आम्ही तज्ज्ञांची तक्रार निवारण समिती स्थापन केल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. ही समिती केंद्राकडून आलेले अहवाल, सीसीटीव्ही फुटेजसह वाया गेलेल्या वेळेचा तपशील पाहणार आहे."

सुबोध सिंह  यांनी सांगितले , NEET-UG ग्रेस मार्क्सच्या मुद्द्याचे पुनरावलोकन केले जाणार असून तयार करण्यात आलेल्या पॅनेलकडून  एका आठवड्यात अहवाल सादर होणार आहे.