JEE Advanced 2024 : जेईई ॲडव्हान्सचा निकाल उद्या जाहीर होणार

उमेदवार jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. निकालाची लिंक उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सक्रिय होणार आहे.

JEE Advanced 2024 : जेईई ॲडव्हान्सचा निकाल उद्या जाहीर होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या वतीने (IIT Madras) घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्सचा (JEE Advanced 2024) निकाल (Result) उद्या म्हणजेच 9 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवार jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. निकालाची लिंक उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सक्रिय होणार आहे. JEE Advanced 2024 चा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांसारखी त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरणे आवश्यक असणार आहे.

JEE Advanced 2024 च्या निकालात उमेदवारांचे विषयवार गुण आणि पेपर 1 आणि पेपर 2 चे एकूण गुण असणार आहे. ऑल इंडिया रँक (AIR) आणि पात्रता स्थिती देखील निकालात नमूद केली जाणार आहे.

टायब्रेकिंगचा नियम काय आहे?

पॉजिटीव्ह गुण अधिक असलेल्या उमेदवारांना वरची रँक मिळेल. समान गुण असल्यास गणितात जास्त मिळवणाऱ्या उमेदवाराला वरची रँक दिली जाणार आहे. तरीही टाय कायम राहिल्यास भौतिकशास्त्रात जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला उच्च स्थान दिले जाणार आहे. या निकषांवर आधारित टाय सोडवला नाही. तर उमेदवारांना समान श्रेणी दिली जाणार आहे. JEE Advanced 2024 मध्ये किमान पात्रता गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा जोसा समुपदेशन (joSAA Counseling) आणि IIT प्रवेशासाठी गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जाणार आहे.