जी-२० निमित्त केंद्रीय विद्यालयात भरला विद्यार्थी-पालकांचा मेळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारमधील प्रत्येक विभाग हा वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. अशातच शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षणाचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस ठेवलेला आहे.

जी-२० निमित्त केंद्रीय विद्यालयात भरला विद्यार्थी-पालकांचा मेळा
Kendrita Vidyalaya Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारताला जी-20 (G-20) चे अध्यक्षपद मिळाले असून त्यानिमित्त मागील काही महिन्यांपासून देशभरातील अनेक शहरांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यापार्श्वभूमीवर लोहगाव येथील केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) वायूसेवा क्रमांक दोनमध्ये विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कार्यशाळा (Workshops), चर्चासत्रे असे विविध उपक्रमही घेण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारमधील प्रत्येक विभाग हा वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. अशातच शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षणाचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस ठेवलेला आहे. शिक्षणाच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी आणि जी-२० ने ठरवून दिलेल्या उद्दिष्टपूर्तीच्या अंतर्गत केंद्रीय विद्यालय वायूयेना क्रमांक २ मध्ये कार्यक्रम घेण्यात आले.

आधी बदल्या अवघड क्षेत्रातील, नंतरच होणार शिक्षक भरती; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांसह पालकांनीही या कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुमार पाटील विद्यार्थी व पालक यांची एकत्रित परिषद घेऊन त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने दिलेले वेगवेगळे कौशल्यपूर्ण उपक्रम चर्चा केली.

चर्चेमध्ये पालकांनी आपली भूमिका शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समोर स्पष्ट मांडली. यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत राबविणाऱ्या प्रत्येक उपक्रमाची माहिती पालकांना दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo