महाराष्ट्र नगरपरिषद भरती : निवड व प्रतिक्षा यादी जाहीर

नगर प्रशासन संचालनालयाच्या अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषदेत विविध पदे भरण्यासाठी 10 जून 2024 रोजी निवडयादी प्रसिद्ध केली आहे. 

महाराष्ट्र नगरपरिषद भरती : निवड व प्रतिक्षा यादी जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र नगरपरिषद गट- क परीक्षा-2023 (Municipal Council Group-C Exam-2023) मधील निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध (Selection list and waiting list published) करण्यात आली आहे. नगर प्रशासन संचालनालयाच्या (Directorate of Municipal Administration) अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषदेत विविध पदे भरण्यासाठी 10 जून 2024 रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. 

निकाल महाराष्ट्र महानगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. लेखापाल किंवा लेखा परीक्षक, कर मूल्यांकन आणि प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक इत्यादी विविध पदांसाठी संगणक आधारित परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आली. नगर परिषद भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा (CBT), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो. 

नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची गुणतालिका १५ मार्च, २०२४ रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती.त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे  १६ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली. ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात असणार आहे असे सांगण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट- क परीक्षा-२०२३ च्या प्रारूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरिता आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आता निवड यादी व प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.