NCET : परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध

परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले असून ते डाउनलोड करण्यासाठी ncet@nta.ac.in या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा.

NCET : परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयआयटी (IIT), एनआयटीसह (NIT) देशभरातील केंद्रीय/राज्य विद्यापीठे/संस्था (Central/State Universities/Institutes), आरआयई (RIE) आणि सरकारी महाविद्यालय (Govt College) यांमध्ये 4-वर्षीय इंटेग्रेटेड टीचर एज्यूकेशन प्रोग्रामच्या (ITEP) प्रवेशासाठी 12 जून रोजी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) होणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकिट (Exam admit card) प्रसिद्ध झाले असून ते डाउनलोड करण्यासाठी ncet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा.  

उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करताना काही अडचण आल्यास ते  ITEP वरील  011-40759000 या क्रमांकावर किंवा ncet@nta.ac.in द्वारे संपर्क साधू शकतात. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि मूळ वैध ओळखपत्र सोबत नेणे अनिवार्य असणार आहे, कारण प्रवेशपत्र आणि ओळखपत्र याशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये (Exam Hall) प्रवेश दिला जाणार नाही.

NCET 2024 परीक्षा NTA द्वारे मराठी, इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती,  कन्नड, मल्याळम, पंजाबी, उडिया, तेलगू आणि उर्दू अशा विविध भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उमेदवारांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत.

असे करा हॉल तिकिट डाउनलोड

NCET हॉल तिकिट 2024 डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट ncet.samarth.ac.in ला भेट द्यावी. वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि दिलेला सिक्युरिटी पिन टाकावा लागेल. त्यांनतर डाउनलोड ॲडमिट कार्ड हा पर्याय निवडावा. आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटआउट घेऊ शकता.