TOEFL : परदेशात शिकण्यासाठी चाललाय? मग ही बातमी वाचाच…

जवळपास दहा हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याबाबतची परीक्षा द्यावी लागते. १६० देशांहून अधिक देशांमध्ये त्यासाठी टोफेल ही चाचणी मान्यताप्राप्त आहे.

TOEFL : परदेशात शिकण्यासाठी चाललाय? मग ही बातमी वाचाच…
TOEFL iBT enhancements

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

TOEFL News : जगभरातील तब्बल १६० हून अधिक देशांमधील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणारी ‘टेस्ट ऑफ इंग्लिश अज फॉरेन लँग्वेज’ (TOEFL) ही चाचणी पुढील काळात अधिक सुलभ होणार आहे. ही परीक्षा (Examination) घेणाऱ्या संस्थेकडून परीक्षेचा कालावधी तीन तासांवरून दोन तासांवर करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. (TOEFL iBT enhancements)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

जवळपास दहा हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याबाबतची परीक्षा द्यावी लागते. १६० देशांहून अधिक देशांमध्ये त्यासाठी टोफेल ही चाचणी मान्यताप्राप्त आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड तसेच युरोपातील बहुतेक देशांमध्ये टोफेल ही चाचणी आधारभूत मानली जाते. यातून इंग्रजी भाषेविषयाचे ज्ञान तपासले जाते. इंग्रजी मातृभाषा नसलेल्या सर्वच देशांतील विद्यार्थ्यांना या चाचणीतून जावे लागते.

‘एज्युकेशनल टेस्टींग सर्व्हिसेस’ (ETS) या संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. संस्थेकडून पुढील सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या रचनेमध्ये बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रमुख बदल म्हणजे ही परीक्षा आता दोनच तासांची असणार आहे. यापूर्वी ही परीक्षा तीन तासांची होती. त्याचप्रमाणे ‘इंडिपेंडंट रायटिंग’ हा प्रश्न आता ‘रायटिंग फॉर अ‍ॅन अ‍ॅकॅडमिक डिस्कशन’ या स्वरूपात राहणार आहे. वाचन आणि आकलनावर आधारित प्रश्न कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कालावधी कमी लागणार आहे.

परीक्षेमध्ये करण्यात आलेली बदल पुढील सत्रापासून म्हणजेच २६ जुलैपासून लागू केल्या जाणार आहे. या बदलांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेचे अभ्यास साहित्य लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे  यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाही ३० एप्रिलपर्यंत परीक्षेची तारीख बदलता येणार आहे. या प्रक्रियेतही सुलभता आणली जाणार आहे.

निकालाच्या प्रक्रियाही पारदर्शक केली जाणार आहे. परीक्षा झाल्यानंतर निकालाची अंतिम तारीख लगेच कळविली जाईल. गुणांमध्ये काही बदल असल्यास त्याची माहिती रिअल टाईम दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेचे शुल्क रुपयांमध्ये भरता येणार असून तशी माहिती त्याठिकाणीच येईल. तसेच खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी मदत कक्ष दररोज बारा तास सुरू ठेवण्यात येणार आहे. हे बदल अधिक कालसुसंगत असल्याने परीक्षा अधिक दर्जेदार होईल, असे ईटीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सेवक यांनी सांगितले.