MU Admission 2024-25: मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशासाठी १३ जूनला मेरिट लिस्ट जाहीर होणार

ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर केला आहे ते muugadmission.samarth.edu.in या प्रवेश पोर्टलद्वारे एमयू प्रथम गुणवत्ता यादी तपासू शकतात.

MU Admission 2024-25: मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशासाठी १३ जूनला मेरिट लिस्ट जाहीर होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठाची अंडरग्रेजुएट (UG program) प्रोग्रामसाठी पहिली गुणवत्ता यादी (Merit list) उद्या म्हणजेच 13 जून रोजी  जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर केला आहे ते  muugadmission.samarth.edu.in  या प्रवेश पोर्टल (admission portal)द्वारे एमयू प्रथम गुणवत्ता यादी तपासू शकतात.

पात्र उमेदवारांना 749 मुंबई विद्यापीठ (mumbai university) संलग्न महाविद्यालये, 60 विद्यापीठ विभाग (University Department) आणि संस्थां (Institutions)  यामध्ये जागा वाटप केल्या जातील. जागा वाटप तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना एमयू प्रवेश पोर्टलवरील उमेदवाराच्या लॉगिनमध्ये त्यांचा अर्ज, पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकावी लागेल.

मुंबई विद्यापीठासाठी अंडरग्रेजुएट प्रोग्रामच्या प्रवेशासाठी विद्यापीठ गुणवत्ता यादीच्या तीन फेऱ्या (Three rounds of merit list) घेतल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत जागा वाटप केल्या आहेत. त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे अंडरटेकिंग फॉर्मसह (Necessary documents including undertaking form) सादर करावी लागणार आहेत.त्याचबरोबर 14 जून ते 20 जून या कालावधीत स्वीकृती शुल्क भरावे लागणार आहे.

मुंबई विद्यापीठातील प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, दुसरी गुणवत्ता यादी 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि तिसरी गुणवत्ता यादी 28 जून रोजी प्रसिध्द  करण्यात येणार आहे. निवडलेल्या उमेदवारांनी प्रत्येक फेरीसाठी अंतिम मुदतीपूर्वी कागदपत्रांची पडताळणी केल्याची खात्री करावी.

समुपदेशन प्रक्रिये(counseling process)दरम्यान सबमिट करायच्या कागदपत्रांची यादी

दहावीच्या मार्कशीटची स्कॅन केलेली प्रत, बारावीच्या मार्कशीटची स्कॅन केलेली प्रत, छायाचित्राची स्कॅन केलेली प्रतिमा, स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रतिमा, हस्तांतरण प्रमाणपत्र, लागू असल्यास जात प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, माजी सैनिक किंवा लागू असल्यास PwD प्रमाणपत्र आणि पात्रता प्रमाणपत्र हे कागदपत्र सबमिट करावयाचे आहेत.