NEET UG निकाल 10 दिवस आधी देण्यामागचं कारण काय ? NTA ने दिले स्पष्टीकरण

परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यप्रणालीवर आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध पेपर लीक प्रकरणांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

NEET UG निकाल 10 दिवस आधी देण्यामागचं कारण काय ?  NTA ने दिले स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET UG 2024) चा निकाल 4 जून रोजी जाहीर झाल्यापासून, परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कार्यप्रणालीवर आणि मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध पेपर लीक प्रकरणांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. NTAने  निर्धारित तारखेच्या 10 दिवस आधी निकाल जाहीर केला, यावरही आता विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावरच NTA ने स्पष्टीकरण दिले आहे.  

NTA ने म्हटले आहे,  परीक्षा सीबीटी मोडमध्ये ऑनलाइन असो किंवा पेपर-पेन मोडमध्ये ऑफलाइन असो,  निकाल एका महिन्यात जाहीर केला जातो. NTA च्या धोरणांनुसार NEET UG 2024 सह सर्व परीक्षांचे निकाल उत्तर की वर आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीनंतर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (National Medical Commission) प्राप्त झालेल्या शिफारशींनुसार निकाल वेळेवर जाहीर करण्याची प्रथा आहे. निकाल जाहीर होण्याची तारीख ही पूर्वनिश्चित तारीख असते आणि तिचा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांशी काहीही संबंध नाही. नियोजित तारखेपासून निकाल जाहीर करण्याचा उद्देश हा आहे की, उमेदवारांच्या हितासाठी प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकेल.

NTA ने NEET UG 2024 च्या निकालाच्या 14 जूनच्या पूर्वनिर्धारित तारखेच्या 10 दिवस आधी म्हणजे 4 जून रोजी निकाल जाहीर केला. तेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जात होते. शिवाय कथित पेपर लिकच्या घटना परीक्षेदरम्यान घडलेले गैरप्रकार, निकालानंतर उपस्थित झालेले प्रश्न अशा परिस्थितीत निकाल 10 दिवस आधी लागल्यामुळे विद्यार्थ्यांकडून शंका उपस्थित केली जात होती.