डिसेंबर 2024 सत्रासाठी ICSI CS परीक्षेच्या तारखा जाहीर

उमेदवार icsi.edu. या अधिकृत वेबसाइटद्वारे परीक्षेच्या तारखा तपासू शकतात.

डिसेंबर 2024 सत्रासाठी ICSI CS  परीक्षेच्या तारखा जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (ICSI) डिसेंबर 2024 सत्रासाठी सीएस  एक्झिक्युटिव्ह  (CA Executive) आणि प्रोफेशनल प्रोग्राम्सच्या  (professional programme) परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उमेदवार icsi.edu. या अधिकृत वेबसाइटद्वारे परीक्षेच्या तारखा तपासू शकतात.

ICSI CS एक्झिक्युटिव्ह, प्रोफेशनल परीक्षा 2017 आणि 2022 अभ्यासक्रमांसाठी 21 डिसेंबर 2024 पासून आयोजित करण्यात येणार असून 30 डिसेंबर रोजी संपणार आहे.

संस्था ICSI डिसेंबर 2024 ची परीक्षा दुपारी 2 ते 5.15 या वेळेत आयोजित करण्यात येईल. ICSI प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी उमेदवारांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल.

CS व्यावसायिक कार्यक्रमांतर्गत पर्यायी विषय 2017 आणि 2022 अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी खुली पुस्तक परीक्षा म्हणून आयोजित करण्यात येणार आहे.