SPPU News : दूरस्थ अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ, प्रवेशात मोठी घट

विद्यापीठाने दि. १ ऑगस्टपासून दूरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. सुरूवातीला इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

SPPU News : दूरस्थ अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ, प्रवेशात मोठी घट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेअंतर्गत (Distance Education Admission) कला व वाणिज्य विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर पदवी या दूरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी यंदा पाठ फिरविल्याचे चित्र आहे. प्रवेशासाठी दोन महिन्यांची मुदत देऊनही मागील वर्षीच्या तुलनेत दोन हजारांनी प्रवेश घटले आहेत. यंदा केवळ ३ हजार २८४ एवढेच प्रवेश झाले आहेत. (Savitribai Phule Pune University News)

 

विद्यापीठाने दि. १ ऑगस्टपासून दूरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. सुरूवातीला इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत महिनाभरासाठी वाढविण्यात आली. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अखेरची मुदत शनिवारी (दि. ३०) सायंकाळी पाच वाजता संपली. आता ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह बुधवार (दि. ४ ऑक्टोबर) पर्यंत त्यांनी निवडलेल्या अभ्यासकेंद्रांवर जमा करावे लागणार आहे.

L.L.B. Admission : पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

 

दोन महिन्यांच्या कालावधीत बीएसाठी ५३२, बीकॉमसाठी ७५६, एमएसाठी १ हजार ६२ तर एमकॉमसाठी ९३४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला आहे. एकूण ३ हजार ९२८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. पण प्रत्यक्षात ३ हजार २८४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. मागील वर्षी या अभ्यासक्रमांमध्ये एकूण ५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

 

मागील वर्षी सर्वाधिक २ हजार ८९ प्रवेश एमकॉमला झाले होते. यंदा मात्र एमएला सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. एमकॉमच्या प्रवेशात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्याचप्रमाणए एमएचे प्रवेशही जवळपास ५०० ने कमी झाले आहेत. बीए व बीकॉमच्या प्रवेशातही लक्षणीय घट झाल्याचे दिसते. विद्यापीठाने प्रवेशासाठी दोन महिन्यांची मुदत देऊनही विद्यार्थ्यांना प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे दिसते.

 

दुरस्थ अभ्यासक्रमांमधील प्रथम वर्षाच्या प्रवेशाची स्थिती

अभ्यासक्रम/वर्ष २०२२-२३ २०२३-२४
बी.ए. ७२८  ५३२
बी.कॉम. १,१०१ ७५६
एम.ए. १,५२४ १,०६२
एम.कॉम. २,०८९ ९३४
एकूण ५,४४२ ३,२८४

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j