LLB 3 वर्ष CET 'Answer Key' वेबसाइटवर प्रसिद्ध

'Answer Key' अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

LLB 3 वर्ष CET 'Answer Key' वेबसाइटवर प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (Maharashtra State Common Entrance Test) कक्षामार्फत LLB ३ वर्ष (LLB 3 years) अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या CET परीक्षाची  'Answer Key' अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Answer Key डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम त्यांच्या MAH CET पोर्टल (MAH CET portal) वर लॉग इन करावे लागेल.

LLB 3 वर्ष Answer Key वर आक्षेप घेण्याची मुदत १ ते ३ एप्रिलपर्यंत उपलब्ध असेल. त्यासाठी प्रति आक्षेप १ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ३ तारखेला आक्षेप विंडो बंद झाल्यानंतर LLB ३ वर्ष सीईटी परीक्षेची अंतिम Answer Key प्रसिद्ध केली जाईल. तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तात्पुरता निकाल घोषित केला जाईल. त्यानंतर अंतिम निकालासाठी उमेदवारांना काही दिवस वाट पाहावी लागेल.

कशी डाउनलोड करा Answer Key 

सर्वप्रथम सीईटी सेल महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा,  तुमचा नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्ड वापरून उमेदवाराने पोर्टलवर लॉग इन करा. समोर दिसणाऱ्या "ऑब्जेक्शन ट्रॅकिंग" पर्यायावर क्लिक करा. तुमच्या समोर वेगवेगळ्या संचाच्या Answer Key दिसतील. त्यापैक एक किंवा पाहिजे ती Answer Key तुम्ही डाउनलोड करु शकतात.