JEE Main 2024 : सत्र 2 परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध, 4 ते 6 एप्रिल दरम्यान परीक्षा

नोंदणीकृत उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

JEE Main 2024 : सत्र 2 परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध, 4 ते 6 एप्रिल दरम्यान परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main 2024)  सत्र 2 च्या परीक्षेसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध (admit card released) करण्यात आले आहे.येत्या  4, 5 आणि 6 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर उपलब्ध असून नोंदणीकृत उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यांचा वापरून डाउनलोड करू शकतात.

जेईई मेन 2024 सत्र 2 च्या परीक्षा यापूर्वी  4 ते 15 एप्रिल दरम्यान नियोजित करण्यात आली होती. मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार 4 ते 12 एप्रिल दरम्यान परीक्षा  आयोजित करण्यात आली आहे. एनटीए जेईई मुख्य परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र नंतरच्या उर्वरित दिवसांमध्ये प्रसिद्ध करेल.  

असे डाउनलोड करा प्रवेशपत्र 

JEE Main Session 2 ची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in 2024 ला भेट द्या. जेईई मेन 2024 हॉल तिकीट लिंकवर क्लिक करा. लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा. JEE मुख्य पेपर 1 प्रवेशपत्र 2024 दिसेल.  हॉल तिकिटाची प्रिंट घ्या. 

जेईई मेन 2024 पेपर 1 (बीई/बीटेक) 4, 5, 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी होणार आहे. पेपर 2 (बीएआर्च आणि बीप्लॅनिंग) 12 एप्रिल रोजी घेण्यात येईल. पेपर 1 साठी, दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल सकाळ आणि दुपार. पेपर 2 ची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12:30 पर्यंत चालेल.