पीएचडी गाईडबाबत प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात एमफुक्टो न्याय मागणार

प्रत्येक पीएच.डी. गाईडला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा हक्क मिळालाच पाहिजे.

पीएचडी गाईडबाबत प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात एमफुक्टो न्याय मागणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगच्या (University Grants Commission  यूजीसी- UGC ) मार्गदर्शक सूचनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) पीएचडी प्रवेश प्रक्रिया व पीएचडी गाईड (phd guide) संदर्भातील नवी नियमावली (New regulations)प्रसिद्ध केले असून त्यामुळे अनेक प्राध्यापकांवर अन्याय होणार आहे.मात्र, प्रत्येक पीएच.डी. गाईडला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा हक्क मिळालाच पाहिजे.त्यासाठी एमफुक्टो संघटना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्याय मागेल, असे एमफुक्टोचे अध्यक्ष डॉ. एस.पी. लवांडे (President of Maharashtra Federation of University and College Teacher Organisation- MFUCTO) यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.

काही महिन्यांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडी संदर्भातील मार्गदर्शक सूचना विद्यापीठांना दिल्या होत्या. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर नियमावली तयार केली असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या नियमावलीमुळे पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रम नसलेल्या महाविद्यालयामधील गाईड म्हणून मान्यता मिळालेल्या प्राध्यापकांना यापुढील काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार नाही. तसेच या नियमावलीमुळे अनेकांना भावीषयात गाईडही होता येणार नाही. परंतु,या निर्णयामुळे केवळ प्राध्यापकच नाही तर विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत काही संघटनांनी यूजीसीकडे पाठपुरावा केला होता. परंतु युजेसीने नियमावलीत बदल करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर यूजीसीच्या नियमावलीमुळे संक्रांत; नियमावलीत बदल करण्यास युजीसीचा नकार

पीएचडी गाईड संदर्भात यूजीसीने घेतलेल्या निर्णयाचा फटका केवळ  पुणे विद्यापीठाशी संलग्नच प्राध्यापकांना नाही तर राज्यभरातील प्राध्यापकांना बसणार आहे. त्यामुळे एमफुक्टो ही प्राध्यापकांची शिखर संघटना ॲक्शन मोडवर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांची भेट घेऊन ही नियमावली मागे घ्यावी, यासाठी संघटनेतर्फे निवेदन देणार येणार आहेत.

एस.पी.लवांडे म्हणाले, पीएचडी गाईड संदर्भातील पात्रतेचे काही निकष आहेत. सर्व निकषांची पूर्तता केलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून पीएचडी गाईडशिप दिली जाते. एखाद्या प्राध्यापकाने पीएचडी गाईड बाबतची पात्रता पूर्ण केली असल्यास त्याला विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन करण्याचा हक्क मिळालाच पाहिजे. केवळ महाविद्यालयात पीजी अभ्यासक्रम नाही म्हणून यापूर्वी गाईडशिप मिळालेल्या प्राध्यापकांना आणि नव्याने गाईड होणाऱ्या प्राध्यापकांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्यासाठी एमफुक्टो संघटना कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्याकडे न्याय मागेल.