राज्यातील ५० विद्यार्थी करणार आसामाचा अभ्यास ; युवा संगमचा संघ आसामाला रवाना

हा अभ्यास दौरा १३ ते  २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

राज्यातील ५० विद्यार्थी करणार आसामाचा अभ्यास ;  युवा संगमचा संघ आसामाला रवाना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अभियानांर्गत युवा संगममार्फत (Yuva Sangam ) एका राज्यातील विद्यार्थी दुसऱ्या राज्याला भेट देऊन सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण करत असतात. या उपक्रमाचा सध्या तिसऱ्या टप्पा सुरू असून यासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेणाऱ्या ५० विद्यार्थ्यांची या भेटीसाठी निवड करण्यात आली आहे.हे विद्यार्थी आसामचा अभ्यास करण्यासाठी रवाना झाले.हा अभ्यास दौरा १३ ते  २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

युवा संगम उपक्रमांतर्गत आसामला ‘सांस्कृतिक-शैक्षणिक प्रवास भेट’  देण्यासाठी राज्यातील ५० विद्यार्थ्यांचा संघ रविवारी सावित्रीबाई फुले पणे विद्यापीठातून रवाना झाला आहे. या संघास शुभेच्छा देण्यासाठी विद्यापीठातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून एआयसीटीइचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, प्रा. संदिप पालवे, डॉ. नितिन घोरपडे, डॉ  ज्योत्स्ना एकबोटे, रासेयोचे संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर यूजीसीच्या नियमावलीमुळे संक्रांत; नियमावलीत बदल करण्यास युजीसीचा नकार

व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ ज्योत्स्ना एकबोटे,  विंद्र शिंगणापूरकर, डॉ नितीन घोरपडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ अभय जेरे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना भारत श्रेष्ठ असल्याचे दाखवून देण्यासाठी ही उत्तम संधी असून सहभागी विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ करून घ्यावा असे आवाहन   केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सदानंद भोसले यांनी केले. यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सविता कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा अमित गोगावले यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य हे आसाम या राज्यासोबत भागीदार राज्य म्हणून सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम राबविणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध राज्यांतील ४५ विद्यार्थी असून डॉ सविता कुलकर्णी, प्रा. अमित गोगावले हे संघ व्यवस्थापक तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून  नितीन कडू, ऋषिकेश चव्हाण, स्वप्निल काटकर सहभागी होणार आहेत.