चांगले गुण मिळवण्यासाठी सोडवा नमुना प्रश्नपत्रिक ; CISCE चे आवाहन 

नवीन परीक्षा पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडू नये यासाठी काही नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत

चांगले गुण  मिळवण्यासाठी सोडवा नमुना  प्रश्नपत्रिक ; CISCE चे आवाहन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) बोर्डाच्या १२ वी च्या परीक्षा १२ फेब्रुवारी पासून सुरु झाल्या आहेत. तर १० वी च्या परीक्षा (10th Exams)  २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. या पार्शवभूमीवर बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी नमुना प्रश्नपत्रिका (Sample Question Paper) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नवीन पॅटर्नमुळे (New pattern) विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडू नये यासाठी काही नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी दिलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव म्हणून वापर करावा, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत.  

ICSE १० वीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न, नमुना प्रश्नपत्रिका 2024ह्या cisce.org या अधिकृत वेबसाइटवर  उपलब्ध आहेत. यामधील उपलब्ध असलेल्या विषयनिहाय नमुना पेपर्सचा वापर करून, विद्यार्थी नवीन परीक्षेच्या पॅटर्नची माहिती मिळवू शकतात.

अशा करा नमुना प्रश्नपत्रिका डाउनलोड
* तुमच्या स्मार्टफोन किंवा काॅम्पुटरद्वारे www.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
* पेजच्या वरच्या साईटला उपलब्ध असलेल्या परीक्षा टॅबवर क्लिक करा 
* ड्रॉपडाउनमधून, ICSE परीक्षा निवडा
* ICSE नमुना पेपर २०२४ वर क्लिक करा
* कोणत्याही विषयाच्या नावावर क्लिक करून विषय निवडा आणि नमुना पेपर उघडेल. 
 तर इयत्ता १२ वी ISC च्या परीक्षा १२ फेब्रुवारी पासून सुरु झाल्या आहेत. याच्या नमुना प्रश्नपत्रिका www.cisce.org उपलब्ध आहेत. 

अशा करा नमुना प्रश्नपत्रिका डाउनलोड 
बोर्डाच्या www.cisce.org या CISCE च्या वेबसाइटवर गेल्यानंतर, मुख्यपृष्ठावरील शीर्ष विभागातील परीक्षा टॅबवर क्लिक करा. तिथे उपलब्ध असलेल्या ISC परीक्षा या पर्यायाला निवडा. खाली स्क्रोल करा आणि २०२४ ISC नमुना पेपरवर क्लिक करा. नमुना पेपर PDF मिळविण्यासाठी तुम्हाला पाहिजे असलेल्या विषयाच्या नावावर क्लिक करा  आणि डाऊनलोड करा या बॅटनवर क्लिक करा..