MPSC ने PSI शारीरिक चाचणी पुढे ढकलली ; निवडणुकीनंतर चाचणी होण्याची शक्यता

शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे. 

MPSC ने PSI शारीरिक चाचणी पुढे ढकलली ; निवडणुकीनंतर चाचणी होण्याची शक्यता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एमपीएससी (MPSC) कडून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२ (Maharashtra Public Service Commission Main Exam - 2022) मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या (Sub-Inspector Cadre of Police) शारीरिक चाचणीचा कार्यक्रम (Program of physical examination) १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत आयोजित केला होता. मात्र, आता ही शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. या कारणांमुळे शारीरिक चाचणीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होवू शकणार नाही.त्यामुळे शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धपत्रकाद्वारे सूचित केले आहे. 

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा - २०२२ च्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले असल्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारखा जाहीर झाल्या नसून सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.त्यामुळे निवडणुका झाल्यानंतरच शारीरिक चाचणी घेतली जाईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नाही. या कारणामुळे शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.