भारतीय रेल्वेत मेगा भरती : RPF ने 4660 सब-इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी मागवले अर्ज 

या भरती मोहिमेद्वारे एकूण 4 हजार 660 पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 4 हजार 208 पदे हवालदाराची तर उर्वरित 452 पदे उपनिरीक्षकांची आहेत.

भारतीय रेल्वेत मेगा भरती :   RPF ने 4660 सब-इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी मागवले अर्ज 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
Railways Mega Recruitment:भारतीय रेल्वेमध्ये नोकरी(Job in Railways) मिळवण्याची चांगली संधी आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (RPSF) च्या सब-इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या (Sub-Inspector, Constable)पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठीची नोटीस काल म्हणजेच 14 एप्रिल रोजी जारी करण्यात आली. या नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी अर्ज  सोमवार 15 एप्रिल 2024 पासून सुरू होतील. पात्र आणि इच्छुक उमेदवार rpf.indianrailways.gov.in. या वेबसाईट वरून  नोंदणी  करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 4 हजार 660 पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 4 हजार 208 पदे हवालदाराची तर उर्वरित 452 पदे उपनिरीक्षकांची आहेत. उपनिरीक्षक पदावर काम करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. 10 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करू शकतात. उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे आणि कॉन्स्टेबल पदासाठी 18 ते 28 वर्षे आहे.
ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी, भौतिक मापन चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी नंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. 
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, माजी सैनिक, महिला उमेदवार आणि EBC श्रेणींसाठी फी 250 रुपये आहे.