JEE मुख्य परीक्षा: 8, 9 आणि 12 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध 

JEE मुख्य परीक्षा: 8, 9 आणि 12 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA)  ने 8, 9 आणि 12 एप्रिल रोजी होणाऱ्या JEE मुख्य परीक्षेसाठी  हॉल तिकीट जारी केले आहेत. या दिवशी होणाऱ्या दुसऱ्या सत्रातील जेईई मुख्य परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर जाऊन त्यांचे  हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड च्या मदतीनेच प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

BE, B.Tech साठी JEE मुख्य परीक्षा 4, 5, 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. सकाळच्या शिफ्टच्या वेळा सकाळी 9 ते दुपारी 12, तर दुपारच्या शिफ्टच्या वेळा 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहेत. बी. आर्क. पेपर 2 ची परीक्षा 12 एप्रिल रोजी होणार असून परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये होणार आहे.

 हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी नाव, रोल नंबर, विषय, परीक्षेची तारीख आणि इतर काही तफावत आहे का ? हे उमेदवारांनी तापासावे.  हॉल तिकीटामध्ये काही तफावत आढळल्यास ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.  हॉल तिकीटावर छायाचित्र आणि स्वाक्षरी स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करा. असे NTA ने स्पष्ट केले आहे.