CBSE च्या नव्या धोरणाचा १० वी च्या विद्यार्थ्यांना फायदा; नापास झालात तरी चिंता नाही 

अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची जागा कौशल्य विषयाने घेतली जाईल आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल त्यानुसार गृहीत धरला जाईल.

CBSE च्या नव्या धोरणाचा १० वी च्या विद्यार्थ्यांना फायदा; नापास झालात तरी चिंता नाही 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने एक महत्त्वपूर्ण धोरण (New policy) लागू केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, "जर १० वी चा विद्यार्थी तीन अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही एका विषयात (उदा. विज्ञान, गणित आणि सामाजिक विज्ञान) नापास झाला आणि सहावा पर्यायी विषय म्हणून देऊ केलेल्या कौशल्य विषयात (Skill Subject) उत्तीर्ण झाला, तर तो विषय ज्यामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची जागा कौशल्य विषयाने घेतली जाईल आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल त्यानुसार गृहीत धरला जाईल.” यामुळे आता दहावीचा विद्यार्थ्यी नापास झाला तरी काळजी करायची काहीच गरज नाही.

विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र यासारखे याचा 10 वी मध्ये  अनिवार्य असलेले विषय अवघड जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. यापैकी कोणत्याही अनिवार्य विषयात 10 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कौशल्य विषयासह बदलण्याचा पर्याय देण्यात आला आहे. 

सीबीएसईने दिलेले कौशल्य विषय खालीलप्रमाणे 

माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा, ऑटोमोटिव्ह, आर्थिक बाजारपेठेचा परिचय, पर्यटन, सौंदर्य आणि निरोगीपणा, कृषी, अन्न उत्पादन, फ्रंट ऑफिस ऑपरेशन, बँकिंग आणि विमा, विपणन आणि विक्री, आरोग्य सेवा, परिधान, मल्टी- मीडिया, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिजिकल ॲक्टिव्हिटी ट्रेनर, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर, विज्ञान आणि डिझाइन थिंकिंग आणि इनोव्हेशनसाठी पायाभूत कौशल्ये.