CA फाउंडेशनचा निकाल जाहीर; २५ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण, असा पाहा निकाल

एकूण १ लाख ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी २५ हजार ८६० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी २४.९८ टक्के इतकी आहे.

CA फाउंडेशनचा निकाल जाहीर; २५ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण, असा पाहा निकाल
CA Foundation Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने  सीए फाउंडेशन (CA Foundation) २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी www.icai.org या वेबसाईटवर आपला निकाल  पाहू शकतात. ICAI फाउंडेशनची परीक्षा २४, २६, २८ आणि  ३० जून रोजी घेण्यात आली होती. देशभरातून ५०० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. 

विद्यार्थ्यांना टपालानेही गुणपत्रिका पाठविली जाणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतर ४ ते ५ आठवड्यांच्या आत विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका प्राप्त न झाल्यास ते ICAI ला dms_examhelpline@icai.in. या मेल आयडी वर तशी तक्रार नोंदवू शकतात. 

दहावी, बारावी परीक्षेची मोठी अपडेट; फॉर्म नं. १७ भरा ऑनलाईन, बोर्डाने दिली माहिती

एकूण १ लाख ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी २५ हजार ८६० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी २४.९८ टक्के इतकी आहे. यामध्ये ११ हजार ४१२ विद्यार्थिनी तर १४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २५.९९ टक्के तर मुलीच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २३.८० टक्के इतके आहे. 

असा पाहा निकाल 

* प्रथम अधिकृत वेबसाइटवर - icai.org वर भेट द्या. 

* वेबसाइटवर दिलेल्या रिजल्ट लिंकवर क्लिक करा.

* आपले  क्रेडेंशियल जसे रोल नंबर आणि जन्म तारीख प्रविष्ट करा.

* निकाल  पहा आणि डाउनलोड करा

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo