CUET PG परीक्षेची Answer Key प्रसिद्ध

उमेदवारांना 5 एप्रिलपासून तात्पुरत्या उत्तर की वर आक्षेप नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे. 

CUET PG परीक्षेची Answer Key  प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट, CUET PG च्या उत्तर की  प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट pgcuet.samarth.ac.in वरून CUET PG 2024 Answer Key डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना 5 एप्रिलपासून तात्पुरत्या उत्तर की वर आक्षेप नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे.  प्रत्येक प्रश्नावर आक्षेप घेण्यासाठी उमेदवाराला 200 रुपये नॉन-रिफंडेबल फी भरावी लागेल.

CUET PG Answer Key डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख असे लॉग-इन क्रेडेंशियल्स वापरावे लागेल. NTA ने  ही परीक्षा 11 ते 28 मार्च दरम्यान 262  शहरांमधील 7,68,414 परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. या परीक्षेसाठी सुमारे 4,62,603 ​​उमेदवारांनी नोंदणी केली होती.

अशी करा Answer Key डाउनलोड 

* उमेदवारांनी सर्वप्रथम pgcuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* मुख्यपृष्ठावरील “प्रश्नपत्रिका आणि उत्तर की प्रदर्शित करा” या लिंकवर क्लिक करा.
* तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि लॉगिन प्रविष्ट करा.
* प्रश्न, उत्तरे आणि तुमच्या प्रतिक्रिया तपासा.