चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर ; मुंबईची संस्कृती देशात दुसरी

मुंबईतील संस्कृती पारोलिया हिने ७४. ८८ टक्के गुण मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

चार्टर्ड अकाउंटंट  परीक्षेचा अंतिम  निकाल जाहीर ; मुंबईची संस्कृती देशात दुसरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मधुर जैनने ७७.३८ टक्के गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर मुंबईतील संस्कृती पारोलिया हिने ७४. ८८ टक्के गुण मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच जयपूर येथील टिकेंद्र सिंगल आणि ऋषी मल्होत्रा यांनी ७३. ५५ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे.

चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल icai.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देऊन निकाल पाहू शकतात.तसेच चार्टर्ड अकाउंटंट इंटरमिजिएट एक्झामिनेशन परीक्षेत जय जुमुलिया याने ८६.३८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक तर तनय भगेरियाने 86 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि ऋषी मेवावाला याने 83.50% गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.