SSC GD Result 2024 : जीडी कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होणार 

परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतील. 

SSC GD Result 2024 : जीडी कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (Staff Selection Commission-SSC)  कॉन्स्टेबल जीडी भरती (Constable GD Recruitment) परीक्षेचा निकाल कोणत्याही क्षणी (Results announced) जाहीर केला जाऊ शकतो.परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतील. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसएससी जीडी भरती परीक्षेचा निकाल एप्रिलच्या मध्यात जाहीर केला जाऊ शकतो. कमिशनने याची पुष्टी केलेली नाही किंवा निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळेबाबत आयोगाने अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केली नसली तरी आज  १५  तारीख असल्याने अधिकृत वेबसाइटवर कधीही निकाल जाहीर केला जाईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निकाल एसएससी जीडी निकाल पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध केला जाईल, ज्यामध्ये परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे रोल नंबर आणि गुण असतील. निवडलेल्या या सर्व उमेदवारांची भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी निवड केली जाईल. आयोग वेगळ्या PDF स्वरूपात निकाल तसेच कट ऑफ गुण देखील प्रसिद्ध करेल.

आसाम रायफल्स, सशस्त्र सीमा बल, सीमा सुरक्षा दल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, इंडो तिबेटी बॉर्डर पोलिस (ITBP), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि CRPF सारख्या सर्व केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (CAPF) SSC GD कटऑफ स्वतंत्रपणे जारी केला आहे . निकालासह, आयोग एसएससी जीडीची अंतिम उत्तर की देखील प्रसिद्ध करेल.

SSC GD 2024 द्वारे केंद्रीय पोलिस दलात कॉन्स्टेबल जनरल ड्युटीच्या एकूण 26,146 पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. त्यामध्ये  BSF - 6 हजार 174, CISF - 11 हजार 025, CRPF - 3 हजार 337, SSB - 635 ITBP - 3 हजार 189, आसाम रायफल्स आणि SSF मध्ये 1 हजार 490 रिक्त पदांचा तपशील आहे.