MPSC परीक्षाच्या तारखा स्थगित विद्यार्थी चिंतेत; समन्वय समितीकडून उपमुख्यमंत्र्यांची भेट

निवडणुका संपताच  भरती प्रक्रिया गती मिळेल अजित पवारांचे आश्वासन.

MPSC परीक्षाच्या तारखा स्थगित विद्यार्थी चिंतेत; समन्वय समितीकडून उपमुख्यमंत्र्यांची भेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) काही दिवसांपुर्वी एक परिपत्रक जाहीर करून, समाज कल्याण विभाग परीक्षा 2023 व राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 (Social Welfare Department Exam 2023 and State Services Pre Exam 2024) या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे सांगितले. या गोष्टीला १५ दिवसांचा कालावधी उलटला असून अद्याप कोणताही निर्णय समोर आला नसल्याने एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने(Competitive Examination Coordination Committee) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना विविध मागण्यांचे पत्र दिले आहे. त्यामुळे येत्या काळात दादा काय निर्णय घेतात याकडे संपुर्ण राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सध्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम चालू आहेत सर्व अधिकारी कर्मचारी  निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे अडचण येत आहे. निवडणुका संपताच  भरती प्रक्रिया गती मिळेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून समन्वय समितीला देण्याात आले आहे. 

'एमपीएससी'ने परीक्षा पुढे ढकलताना परीपत्रकात 'यथावकाश' हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जाणार यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नैराश्य (Depression among candidates) आले असून त्यांच्यासमोर आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत आहेत. 

नेमक्या काय आहेत मागण्या..

 राज्यसेवा जागावाढ व परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर द्यावी. ही शेवटची संधी असल्याने क्लास वन ची एक हजार पदे  काढावीत. कंबाईन 2024 ची जाहिरात जास्तीत जास्त जागांची काढाव्यात. समाजकल्याण परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या त्या परीक्षा तारीख लवकर जाहीर करावी. सरळसेवा परीक्षा निकाल काही बाकी आहेत. ते वेळेत लावण्यात यावा.   

__________________________________

MPSC आणि स्पर्धा परीक्षेतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. विविध निवेदने देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल नागपुरातून मुंबईत परतले नसल्याने भेट होऊ शकली नाही. परंतु त्यांच्या कार्यालयात आणि त्यांचे सचिव यांना स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांची वस्तुस्थिती सांगून निवेदने देण्यात आली आहे. सरळसेवा पदभरती मधील प्रलंबित निकाल आणि परीक्षेबाबत (ZP & इतर) ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत आहोत.

महेश घरबुडे (कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती)