स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धतीसाठी भारत जगाचे नेतृत्व करेल - डॉ.सौम्या स्वामीनाथन

डॉ. सायरस पूनावाला यांना लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धतीसाठी भारत जगाचे नेतृत्व करेल - डॉ.सौम्या स्वामीनाथन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
 विकसनशील देशात कॅन्सर सारख्या रोगाचे उपचार खुप महागडे आणि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहेत. त्यामुळे पुढील काळात या विषयासह लोकसंख्या, अन्न व्यवस्था, पाणी आणि हवेची गुणवत्ता,राहणीमान या सगळ्यांवर काम करावे लागणार आहे.तसेच भविष्यात स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धतींसाठी भारत जगाचे नेतृत्व करेल,असा विश्वास डब्ल्यूएचओच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन Former Chief Scientist of WHO Dr. Soumya Swaminathan)यांनी केले.त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचे महत्त्वही अधोरेखित केले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी  स्वामीनाथन  बोलत होत्या.सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख व उद्योजक डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेसचे प्रा. रेमंड बिर्ग, रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरचे प्रा. ज्ञान चंद्रा, परिषदेचे मुख्य आयोजक डॉ.राजेश गच्चे,बायोटेक्नॉलजी विभाग प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित होते.  

हेही वाचा : UGC कडून आरक्षण संपवण्याचा डाव; विरोधकांची आरक्षित जागांविषयीच्या मसूद्यावर टीका

ग्लोबल वॉर्मिंगमचा आपल्या सर्वांवर परिणाम होत असून जैवविविधतेचे होणारे नुकसान, वाढते जागतिकीकरण, शहरीकरण यामुळे भविष्यातील साथीच्या रोगांचा धोका अधिक वाढला असून यापासून बचाव करायचा असेल तर याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे,असे डॉ. स्वामीनाथन यावेळी सांगितले. 

याप्रसंगी डॉ. सायरस पूनावाला यांनी त्यांचा विद्यार्थी ते ‘ ‘व्हॅक्सिन किंग’पर्यंतचा प्रवास उलगडला. तसेच नुकतेच यूएस एफडीएने आम्हाला मंजूरी दिली असून मागील महिन्यात लसींचे लाखो डोस यूएसला पुरवले आहेत.त्याचाप्रमाणे  यूएसला लस पुरवणारी सिरम ही पहिली भारतीय कंपनी असल्याचे डॉ.पूनावाला यांनी यावेळी सांगितले.
 औषधी आणि लस बनविण्यासाठी भविष्यात एआयची मदत होणरा असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यावेळी सांगितले,
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी या परिषदेचे महत्त्व सांगताना सार्वजनिक आरोग्यावर होत असलेल्या संशोधनात विद्यापीठाच्या योगदानाबद्दल माहिती दिली. 
-----------------------------------------

डॉ. सायरस पूनावाला यांना लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड
जागतिक सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल  डॉ. सायरस पूनावाला यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड’ देण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.