एमबीए, लॉसह विविध सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या किंवा अपूर्ण अर्ज भरलेल्या उमेदवारांना वाढीव मुदतीत अर्ज भरता येणार आहे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एमबीए, लॉसह विविध सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास  मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे(State Common Entrance Test Cell)सीईटी परीक्षा घेतली जाते.विविध सीईटी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात (Extension of application deadline for CET exams)आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या किंवा अपूर्ण अर्ज भरलेल्या उमेदवारांना वाढीव मुदतीत अर्ज भरता येणार आहे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार बहुतांश अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत 29 जानेवारीपर्यंत होती.मात्र परीक्षांकरता अर्ज भरलेल्या उमेदवारांची डाटा तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले. तसेच अनेक उमेदवारांनी व त्यांच्या पालकांनी अर्ज भरण्यास मदत वाढ मिळावी , अशी विनंती सीईटी कक्षाकडे केली होती. विद्यार्थी हिताचा विचार करून मुदत वाढीचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार बीएड तीन वर्ष , एमएड सीईटी, बीएड व बीएड ईएलसीटी सीईटी २०२४ आणि बीपीएड सीईटी परीक्षेसाठी आता 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.विधी ३ वर्ष सीईटी परीक्षेसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता 10 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे.

एमबीए, एमएमएस सीईटी साठी तसेच एमआर्च सीईटी ,एम.एचएमसीटी सीईटी,एमसीए साठी अर्ज भरण्यास ६ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

------------------------------------