आयआयटी जेईई ऍडव्हान्स 2024 : बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

उमेदवारांना निकाल आज सायंकाळी 5 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर पाहता येणार आहे.

आयआयटी जेईई ऍडव्हान्स 2024 : बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयआयटी जेईई ऍडव्हान्स 2024  (IIT JEE Advanced 2024) परीक्षेअंतर्गत बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या (B.Arch) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी आज महत्वाचा दिवस आहे.

आयआयटी मद्रास (IIT Madras)च्या वतीने जेईई ऍडव्हान्स 2024 अंतर्गत देशभरातील विविध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) मध्ये आर्किटेक्चरच्या बॅचलर डिग्री कोर्स (BArch) प्रवेशासाठी आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट (AAT) घेण्यात आली होती. त्याचा निकाल (result) आज म्हणजेच शुक्रवार, 14 जून 2024 रोजी जाहीर होणार आहे.

संस्थेने ठरवून दिलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार,  उमेदवारांना निकाल आज सायंकाळी 5 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर पाहता येणार आहे. IIT मद्रासने 12 जून रोजी JEE Advanced 2024 अंतर्गत प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.

असा पहा निकाल

विदयार्थ्यांना त्यांचे निकाल तपासण्यासाठी आणि स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी या परीक्षेच्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, उमेदवारांना मुख्यपृष्ठावर दिलेल्या AAT 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल आणि नवीन पृष्ठावर, त्यांचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख तपशील आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर तपशील भरा आणि सबमिट करावा लागेल यानंतर उमेदवार त्यांचा निकाल तपासू शकतील आणि स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतील.