SSC GD 2024: खुशखबर.. निकाल जाहीर होण्याआधीच रिक्त पदांची संख्या झाली दुप्पट 

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार आता BSF, CISF, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB मध्ये कॉन्स्टेबल रँकच्या एकूण 46 हजार 617 जागा या परीक्षेद्वारे भरल्या जातील.

SSC GD 2024: खुशखबर..  निकाल जाहीर होण्याआधीच रिक्त पदांची संख्या झाली दुप्पट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एसएससी जीडी (SSC GD) परीक्षेचा निकाल कधी हाती येणार (Results announced) याची उच्छुकता असताना त्यापुर्वीच रिक्त पदांची संख्या जवळजवळ दुप्पट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांसाठी ही एकप्रकारे खुशखबरच म्हणावी लागेल. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा 2024 द्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार (Notification released) आता BSF, CISF, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB मध्ये कॉन्स्टेबल रँकच्या एकूण 46 हजार 617 जागा (A total of 46,617 posts of constable rank) या परीक्षेद्वारे भरल्या जातील. यापूर्वी SSC ने 26 हजार 146 पदे भरण्याची घोषणा केली होती.

कॉन्स्टेबल GD परीक्षा 2024 साठी SSC ने सुधारित केलेल्या रिक्त पदांनुसार, आता CISF मध्ये 13,632 पदे भरली जातील. त्याचप्रमाणे, BSF मध्ये 12, 076 पदे, CRPF मध्ये 9,410 पदे आणि ITBP मध्ये 6,287 पदे भरायची आहेत. 

GD कॉन्स्टेबल परीक्षा 2024 साठी SSC ने निर्धारित केलेल्या निवड प्रक्रियेअंतर्गत, पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत घेण्यात आली. त्यानंतर काही केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाल्याने ३० मार्च रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. यानंतर आयोगाने अनौपचारिक उत्तरे प्रसिद्ध केली होती आणि त्यावर उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांपैकी पुनरावलोकनानंतर, आता निकाल (एसएससी जीडी कॉन्स्टेबल निकाल 2024) जाहीर केले जाणार आहेत. आयोगाने निकाल जाहीर करण्याची तारीख जाहीर केलेली नाही, मात्र निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रकाशित केलेल्या माहितीवर लक्ष ठेवावे.

असा पाहता येणार निकाल 

सर्वप्रथम ssc.gov.in या आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होम पेजवर Result पेज ओपन करा. कॉन्स्टेबल जीडी (Constable GD tab) टॅबवर जा. कॉन्स्टेबल जीडी निकाल 2024 पीडीएफ ओपन करा. आपला रोल नंबर टाकून आपला निकाल पाहा. आपल्या निकालाची हार्डकॉपी डाऊनलोड करून प्रिंट काढून ठेवा.