हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून प्राचार्याला चोप; मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरा, जबरदस्तीने ख्रिस्ती शिक्षण दिल्याचा आरोप

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून प्राचार्याला चोप; मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरा, जबरदस्तीने ख्रिस्ती शिक्षण दिल्याचा आरोप
School Principal Attacked in Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील डी. वाय. पाटील शाळेच्या (D Y Patil School) प्राचार्यांना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून (Hindu Activist) चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना जबरदस्तीने ख्रिस्ती शिक्षण देणे, तसेच मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) लावल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबतच्या तक्रारी पालकांनी केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. (Pune School)

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्यांचे नावे अलेक्झांडर रीड असे असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

Pune News : पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण

माध्यमांशी बोलताना एका कार्यकर्त्याने सांगितले की, या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक मुलांच्या पालकांनी तक्रारी केल्या होत्या. शाळेमध्ये मुलांकडे जबरदस्तीने ख्रिस्ती प्रार्थना म्हणून घेतल्या जातात. तसेच हिंदू सणांच्या दिवशी सुट्टी दिली जात नाही. त्याचप्रमाणे मुलांच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आम्ही याविरोधात आंदोलनासाठी शाळेत आल्यानंतर सर्व तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले.

पाहा व्हिडीओ : https://twitter.com/EduvartaNews/status/1676839959292936192?s=20

दरम्यान, पालकांकडून मंगळवारी याबाबत तक्रारी आली असून त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाने प्राचार्यांना सक्तीचे रजेवर पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD