Pune News : पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण

कोथरूड पोलिसांनी ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रश्मी कुलकर्णी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण
Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Pune News : पुण्यात कोथरूड (Kothrud) येथील एका खासगी क्लासच्या (Private Classes) शिक्षिकेने (Teacher) शिकवणीसाठी आलेल्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांला (Student) लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूड पोलिसांनी ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रश्मी कुलकर्णी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या वडिलांनी नुकतीच याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

PSI Result 2022 : पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, १० हजार विद्यार्थी पात्र

मारहाण झालेल्या विद्यार्थ्याला याच क्लास मधील एका मुलाने बाथरूम मध्ये कोंडून ठेवले होते. त्यामुळे संबंधित मुलाने जोरजोरात दरवाजा वाजवला. त्यामुळे क्लासच्या शिक्षिकेने 'तुला संस्कार नाहीत का शिकवले', तुला अक्कल नाही का? तुझे कपडे काढून तुला झोपडपट्टीतून फिरवेन, असे म्हणत पोलिसांत देण्याची धमकी दिली आणि लोखंडी रॉडने हातावर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD